vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 

रायगड प्रतिनिधी:- सहाय्यक संचालक, संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, रायगड जिल्हा परिषदेसमोर “कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा २०२५ उत्स्फुर्त स्पर्धक व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली

“कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सर्व उपस्थितांच्या समवेत कुष्ठरोगाबाबतची प्रतिज्ञा घेवून झाली. सदर स्पर्धेत १३१ स्पर्धक सहभागी होते. ही स्पर्धा संपूर्ण अलिबाग शहरांत ०३ किमी अंतरात घेण्यात आली. स्पर्धेत मुलांसोबत मुलीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सदर स्पर्धेत विजेते स्पर्धक मुले-प्रथम क्रमांक: कु. रामू गणत पारधी-(रक्कम रु.४,०००/-)व्दितीय क्रमांकः कु. चिंतामण मारुती शिंगवा-(रक्कम रु.२,५००/-)-तृतीय क्रमांत :- कु. स्वागत समिर पाटील (रक्कम रु.१,५००/-)-विजेते स्पर्धेक मुली-प्रथम क्रमांक: कु.ऋतुजा जयवंत सकपाळ,(रक्कम रु.४,०००/-),व्दितीय क्रमांकः कु. कथा अतुल वाडकर,-(रक्कम रु.२,५००/-),तृतीय क्रमांत कु. प्राजक्ता परशराम शिंदे (रक्कम रु.१,५००/-)वरील विजेता स्पर्धकांचा प्रशस्ती पत्रके व ट्रॉफी देवून गुणगौरव करण्यात आला व बक्षीसाची रक्कम त्यांच्या बँकखात्यात जमा होणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी इतर सर्व स्पर्धकांना देखील प्रशस्ती पत्रे वाटप करण्यात आले.

या स्पर्धेसाठी वैद्यकीय अधिकारी, डॉ. सचिन संकपाळ, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अक्षयराज राठोड, ग्रामीण वैद्यकीय असोसिएशन, अध्यक्ष, डॉ. निशिगंध आठवले, वैद्यकीय असोसिएशन, सेक्रेटरी, डॉ. चांदोरकर, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष, डॉ. राजाराम हुलवान, लायन्स डायमन्ड अध्यक्ष, डॉ. रेखा म्हात्रे, जे.एस.एस. अध्यक्ष डॉ. नितिन गांधी, रिलायन्स क्लब अध्यक्ष, जल्हा वाहतूक उपनिरिक्षक श्री. प्रकाश काळोखे, श्री. के.डी पाटील, चेंढरे पोलिस पाटील, श्री. विकास पाटील, व इतर सामजिक कार्यकर्ते तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी वृंद उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जितो’ संघटनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ स्पर्धा

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta