vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

 

        बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून संपादित केलेल्या मातृतीर्थ बुलढाणा या कॅाफी टेबल बुक निर्मितीमधील योगदानासाठी बुलढाण्यातील प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे व पुरातनवास्तु, हेमाडपंथी मंदिरे तसेच पुरातन इतिहास जतन व संवर्धन करीत असलेल्या व इतर स्थळांची माहिती राज्यातील तसेच देशातील नागरिकांना व्हावी व पर्यटनाच्या संखेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा या कॉफी टेबल बुक मध्ये बुलढाण्यातील प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम, कीटक अभ्यासक फोटोग्राफर प्रा.आलोक शेवडे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. या छायाचित्रांच्या समावेशामुळे हे कॉफी टेबल बुक सुंदर व आकर्षक बनले असून या योगदानासाठी जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी या छायाचित्रकारांना प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र देऊन प्रजासत्ताक दिनी सन्मानित केले. या कॅाफीटेबल बुकमध्ये मनिष झिमटे, सागर राणे, रोहित शर्मा, सुनील वाकोडे, चेतन राठोड, विजय पाटील, ऋषिकेश कुळकर्णी यांनी टिपलेल्या छायाचित्रांचाही समावेश आहे. या सर्व छायाचित्रकार बांधवांचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. 00000000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘रेड रन’ स्पर्धा

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*

शासकीय अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामदतीने सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार   

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार