vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

            जालना, प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यामध्‍ये संशोधन वृत्ती विकसीत होण्‍यास मदत, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्‍यास चालना मिळावी या उद्देशाने महादीप उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून अंतराळ संशोधन संस्थेमधील शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार दि. 5 फेब्रूवारी 2025 रोजी तालुकास्‍तरावरील पात्र 348 विद्यार्थ्‍यांची जिल्‍हास्‍तरीय निवड चाचणी परीक्षा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह व महसूल भवन सभागृहात उत्साहात पार पडली.

यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ.श्रीकृष्‍ण पांचाळ, जिल्‍हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेचे जेष्‍ठ अधिव्‍याख्‍याता डॉ.संजय येवते, अधिव्‍याख्‍याता सय्यद अख्‍तर, योगेश जाधव, भारत सुर्यवंशी, डॉ.श्रीहरी दराडे, श्रीमती निलोफर पटेल, श्रीमती प्रेरणा मोरे, उपशिक्षणाधिकारी श्‍याम देशमुख, सुभाष भालेराव, श्रीमती विनया वडजे,शिक्षण विस्‍तार अधिकारी श्रीमती गिता नाकाडे, गट समन्‍वयक के.जी.राठोड, कांबळे, जेटेवाड, वसंत शेवाळे, एस.बी. नेवार, अशोक ढेरे, केंद्र प्रमुख सुनिल ढाकरगे,बार्शीकर,लोखंडे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनिल मावकर,साधन व्‍यक्‍ती डॉ.करुणा हिवाळे,विद्या पतंगे, ज्‍योती चव्‍हाण, श्री.चव्‍हाण, संदिप देशमुख, यांच्‍यासह गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्‍तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्‍याध्‍यापकांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यामध्‍ये संशोधन वृत्ती विकसीत होण्‍यास मदत, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख, शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती, यासह वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्‍यास नक्‍कीच चालना मिळावी यासाठी जिल्‍हाधिकारी डॉ.श्रीकृष्‍ण पांचाळ व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍ह्यातील जिल्‍हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्‍ता पाचवी ते आठवी वर्गामधील मुलांची शाळा, केंद्र, तालूका व जिल्‍हास्‍तर अशी निवड चाचणी परिक्षा घेवून या परिक्षेतील उत्‍तीर्ण विद्यार्थ्‍यांना महादीप या उपक्रमांतर्गत निवड चाचणीच्या माध्यमातून निवड करुन देशातील नामांकित अशा अंतराळ संशोधन संस्था, संशोधन केंद्र या ठिकाणी शैक्षणिक सहल आयोजन करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून महादीप या जालना जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाच्‍या नाविन्‍यपूर्ण उपक्रमाच्‍या माध्‍यमातून माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 महिन्यात या अभियानांतर्गत जिल्‍ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्‍त्र, सामान्‍य ज्ञान इत्यादी विषयावर आधारीत 50 गुणांची लेखी परिक्षा शाळा, केंद्र, तालुका स्‍तरावर आयोजित करण्‍यात आली होती. तालुकास्‍तरावर 2 हजार 500 विद्यार्थ्‍यांनी सदरील परिक्षा दिली होती. त्यापैकी 348 विद्यार्थ्‍यांची जिल्‍हास्‍तरावर निवड चाचणी परिक्षा घेण्‍यात आली या परिक्षेतून इयत्‍ता पाचवी ते आठवी वर्गनिहाय प्रत्‍येकी 10 विद्यार्थ्‍यांची निवड करुन या महिन्यात त्‍यांना अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश, हैद्राबाद येथील विज्ञान केंद्र, या ठिकाणी शैक्षणिक सहलीची संधी उपलब्‍ध करुन दिली जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्‍यांसाठी अन्‍नामृत फाऊंडेशनच्‍या वतीने अल्‍पोपहाराची व्‍यवस्‍था करण्यात आली होती.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

ऑपरेशन अभ्यास’ मॉक ड्रिल उद्या 13 मे रोजी नवी मुंबईतील ‘वाशी – सेक्टर 12’ मध्ये

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

फुले शाहू आंबेडकरांचे खरे वैचारीक वारसदार कांशीराम जी आहे ऍड साहेबराव सिरसाठ पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न मिळाल्याने चळवळी ला गती मिळते