vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार!माहिती तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी करणार- मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा…

महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार!माहिती तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी करणार- मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा…

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग हा युनेस्को सोबत भागीदारी करणार असून २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानशी संबंधीत आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केली.

नोबेल पारितोषिक विजेत्या, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. क्वांटम विज्ञानाच्या परिवर्तनकारी क्षमतेला ओळखून, महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रात संशोधनाचा, नवकल्पनांचा आणि क्षमता निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे.

मंत्री अ‍ॅड.शेलार म्हणाले की, ही भागीदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” या दृष्टीकोणाशी जोडलेली आहे. भारत सरकारने २०२३ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयालांतर्गत राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, ते भारताच्या क्वांटम क्षेत्रातील नव्या संधींसाठी मार्ग तयार करत आहे.

“महाराष्ट्र या क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय संस्थांसोबत सक्रियपणे जोडले जाण्याचा प्रयत्न करीत असून एक एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहे,” असेही मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी सांगितले.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग, विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसाठी परिषद, कार्यशाळा आणि तज्ञांची व्याख्याने आयोजित करणार आहे. कौशल्यविकास, तंत्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय क्वांटम मिशन आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल, अशी माहिती देखील मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी दिली.     भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विश्वविद्यालयासोबत भागीदारी करून क्वांटम संबंधित कौशल्यविकास कार्यक्रम राबवण्याचा आणि केंद्र सरकाराच्या सहकार्याने ‘क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब’ स्थापन करण्याचा विचार करत असल्याबाबत देखील मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी सांगितले.

उच्चस्तरीय तज्ञांच्या टास्कफोर्स अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्या कृत्रिम बुध्दीमता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात क्वांटम तंत्रज्ञानाचा आधीच समावेश करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र एआय धोरण टास्कफोर्स आणि सायबर सुरक्षा धोरण टास्कफोर्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या परिणामांचा अभ्यास करत असून, ते त्यांच्या धोरणात्मक शिफारशींमध्ये संबंधित विषय समाविष्ट करतील, असेही मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी यावेळी सांगितले.000

संबंधित पोस्ट

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी-स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

नक्शा प्रकल्पः कन्नड नगरपालिका हद्दीत मोजणीसाठीमालमत्ताधारकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta