vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा, प्रतिनिधी- पॅन, आधार किंवा बँक तपशील यासारखी संवेदनशील माहिती विचारणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबरवरील लिंकवर कधीही ब्लिंक करु नका, विशेषत: केवायसी अपडेटच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला कधीही उत्तर देऊ नका, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षित इंटरनेट कार्यशाळेत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी संजीव कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सायबर गुन्हेगारी वाढत आहे, या गुन्हेगारीला बळी पडू नये, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, सायबर गुन्हेगार हा ओटीपी, एटीएम कार्डच्या पाठीमागील कोडची माहिती विचारता असतात . आपण ओटीपी व एटीएम कार्ड वरील कोड सांगतो आणि फवणुकीला बळी पडतो. असे प्रसंग बऱ्याच व्यक्तींवर येतात. उच्च परताव्याचे आश्वासन देणाऱ्या ऑनलाईन गुंतवणूक ऑफरवरही विश्वास ठेवू नका. तसेच तसेच चुकीच्या संकेतस्थळांना ॲक्सेस देवू नका.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ऑफीसद्वारे कामकाज होणार आहे. धनादेश पद्धत बंद होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जबाबदारी वाढणार आहे. कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉल समजावून घेऊन वापर करावा, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कार्यशाळेत सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न 560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या..

vishwatmaklokswamivarta

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये887

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta