vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

जालना, प्रतिनिधी :- नागरिक, शासकीय कर्मचारी, मुले तसेच तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदारीने वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिनाचे आयोजन केले जाते. तरी शासकीय कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी उन्मेश सपकाळ यांनी केले.

जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा कोषागार अधिकारी पंजाब पुंडगे, तहसीलदार प्रणाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे सादरीकरण व तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी उन्मेश सपकाळ यांनी केले. सुरक्षीत ई-मेल वापर, सुरक्षीत पासवर्ड, सुरक्षीत डेस्कटॉप, सायबर गुन्हेगारी, समाज माध्यमांचा वापर आदि विषयक तांत्रिक बाबींवर श्री. सपकाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा उद्देश नवीन ऑनलाइन समस्या आणि समाज माध्यमांच्या चिंताबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिन दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी “टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट” या थीम अंतर्गत जालना जिल्ह्यात साजरा केला गेला. सायबर जागरुकता कार्यशाळेस मोठ्या संख्येने अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अडचणींच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा* 

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळा

वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा – प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

शिक्षक साहित्यसंमेलन साहित्यामुळे जीवन प्रेरणा मिळते- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*— खा.श्रीरंग बारणे*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*