vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ” – डॉ सुकेश झंवर

“दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ” – डॉ सुकेश झंवर

बुलढाणा प्रतिनिधी

“दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिलेला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ समाजासाठी दिशादर्शक आहे. नरेंद्र लांजेवार यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार समाज प्रबोधनाचा वारसा समर्थपणे चालवत आहेत” असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे परिवाराचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी नरेंद्र लांजेवार यांच्या तिसर्‍या स्मृतिदिनी गोवर्धन सभागृहात आयोजित गझलरंग मराठी मुशयाराच्या प्रारंभी केलेल्या अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी डॉ. सुकेश झंवर यांचा बुलढाणा अर्बनचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गझल मंचावर ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे, सुप्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड, प्रज्ञा लांजेवार, तसेच गझलरंगचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक सुरेश वैराळकर यांची उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे, नरेंद्र लांजेवार यांच्या स्मृतींना उजाळा देत असे म्हणाले की “मानवी जीवन क्षणभंगुर असले तरी नरेंद्र लांजेवार मात्र याला अपवाद आहेत, मृत्यूनंतर सुद्धा मानवी जीवनाचे अक्षरत्व आपल्या प्रेरणादायी कार्याच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध केले आहे. “

   नरेंद्र लांजेवार यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त सुरेश भट गझल मंच, पुणे द्वारा प्रस्तुत गझलरंग मराठी मुशायरा या या अत्यंत बहारदार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची धुरा सुप्रसिद्ध गझलकार सुरेश वैराळकर यांनी आपल्या खुमासदार संचालनाने समर्थपणे सांभाळली. तब्बल अडीच तास रंगलेल्या या मराठी गझल मुशायरा मध्ये महाराष्ट्रातील तरुण गझलकार गोपाल मापारी, आत्माराम जाधव, राज रणधीर, अपूर्व राजपूत, अश्विन मोरे प्रियंका गिरी, डॉ विजयालक्ष्मी वानखेडे, कीर्ती वैराळकर इंगोले यांनी आपल्या दर्जेदार गझल सादर करून बुलढाणा शहरातील जाणकार रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. या गझल मुशायरा मध्ये विशेषत्वाने सहभागी झालेले आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त शायर डॉ. गणेश गायकवाड यांनी आपल्या हिंदी व मराठी गझल सादर करून रसिकांना तृप्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. विनोद देशमुख यांनी केलेगझलरंग पूर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल मापारी यांनी केले. या कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. प्रगती वाचनालय परिवार, सहर ए गझल अकादमी आणि लांजेवार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी डॉ गणेश गायकवाड, डॉ. कि.वा.वाघ,रवीकिरण टाकळकर, चंद्रशेखर जोशी, बापू देशमुख, वैशाली तायडे,मकरंद लांजेवारयांचेसह नरेंद्र लांजेवार मित्र परिवार, सहर ए गझल अकादमी, प्रगती वाचनालय परीवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला होता.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता*‘प्लास्टिकक्त नवी मुंबई’साठी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम*

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी

vishwatmaklokswamivarta

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

10 जून रोजी कोकण विभागीयपेन्शन अदालत

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta