vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

प्रत्येकाने आत्मचिंतन केलेच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे आज हरिकिर्तन

प्रत्येकाने आत्मचिंतन केलेच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे आज हरिकिर्तन

जालना/प्रतिनिधी-ैआत्मचिंतन हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. आत्मचिंतन करणे सुध्दा चांगले कार्य आहे, असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला. येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळ्यास उत्साही वातावरणात प्रारंभ झाला आहे. यावेळी आयोजित भागवत कथेचे व्दितीय पुष्प गुंफतांना राहुल म. जोशी हे बोलत होते. दरम्यान, उद्या रविवारी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे हरिकिर्तन होणार आहे.

पुढे बोलतांना जोशी महाराज म्हणाले की, एका अंशी वर्षाच्या वृध्दाने आपल्यापुढे आणून डायर्‍या ठेवल्या. त्या डायर्‍यांमध्ये काय होते तर त्यांची दिनचर्या होती, कोणतेही पोथी, पुराण नव्हते. आपल्या पैकी किती जण दिनचर्या लिहीतात? असा प्रश्न करुन त्यांनी आजच्या कथेदरम्यान, कौरव, पांडव आणि द्रोपदी, देवी भागवत आणि महादेवचाही उल्लेख केला. त्यांनी यावेळी विविध भजनं आपल्या कथेदरम्यान गायिली.दरम्यान, किर्तन सेवेत हभप भगवान महाराज सावंत यांनी घेईल मी जन्म । याच साठी देवा॥ तुझि चरण सेवा साधावया ॥ या संत तुकाराम महाराजांच्या ओवीवर सुंदर असे निरुपन केले. ते म्हणाले की, संत विचारांची ही फलश्रुती आहे की, ऐकणार्‍यांच्या मनात चांगले विचार येतात. वाईट नाही. लोखंडाला परिस लागला की त्याचे सोने होते. पेढा कसाही असला तरी तो गोडच लागतो. तसेच संत विचाराचेही आहे. या ठिकाणी मनुष्याला चांगले विचार- आचार मिळतात, असेही त्यांनी यावेळी विस्तृतपणे सांगितले.

या सप्ताहात उद्या सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी राजेद्र महाराज वाघमारे आणि मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी हभप श्रीहरी रसाळ महाराज तर बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी हभप प्रा. उध्दव महाराज राऊत (आळंदी), गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी हभप त्रिंबक महाराज दस्तापुरकर यांचे हरिकिर्तन होणार असून शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी ंंहभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर याच दिवशी तत्पूर्वी श्री. गजानन महाराज पालखी मिरवणूक (दिंडी) सोहळा होणार आहे. यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार असून दररोज सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, श्री. गजानन विजय ग्रंथ पारायण, त्यानंतर गाथा भजन तर दुपारी 1 ते 5 यावेळेत श्री. भागवत कथा होणार आहे. तर सायंकाळी हरिपाठ व रात्री 9 ते 11 यावेळेत हरिकिर्तन व त्यानंतर हरीजागर होणार आहे. तत्पूर्वी भागवत पुजन व समाप्ती महाआरती सौ. व श्री. सिमा शामराव भांदरगे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रगट दिनाचा महाप्रसादाचे मुख्य यजमान सौ. व श्री. सरिता दत्तात्रय शेजुळ हे राहणार असून भजनी मंडळ आणि किर्तन सेवेस साथ देणार आहेत मृदंगाचार्य हभप भगवान म. जाधव व तुकाराम म. मुढे, गायनाचार्य हभप हभप विष्णू म. सावंत हे ज्ञानेश्वर म. जोशी, भगवान म. लकडे, गिरी महाराज, रमेश प. पवार, यादव म. जाधव, उध्दव म. राठोड तर हरिपाठाचे नेतृत्व हभप विष्णू म. सावंत हे करणार आहे.तर श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून हभप आत्माराम महाराज बिडवे हे काम पाहत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. सपंतराव पाटील व समस्त विश्वस्तांनी केले आहे.————————————-

संबंधित पोस्ट

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

१८ डिसेंबरपासून #माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सर्वांगीण सुविधा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढावे- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन