vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना; लाभार्थ्यांस आर्थिक मदत

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना; लाभार्थ्यांस आर्थिक मदत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत श्रीमती ज्योती अनिल चव्हाण यांना दोन लाख रुपये विमा रकमचे वितरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्र चे उप-विभागीय व्यवस्थापक मुकुंद कांबळे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, गारखेड़ा शाखेचे व्यवस्थापक अभिनव इंगोलेआदी मान्यवर उपस्थित होते.

   प्रधानमंत्री जीवन ज्योती या योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक सुरक्षिततेकरिता ही विमा योजना आवश्यक आहे, तरी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.    या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबास आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून, भविष्यातही गरजू नागरिकांनी या योजनेचा जास्तीत लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र चे उप-विभागीय व्यवस्थापक मुकुंद कांबळे यांनी केले.

योजनेचे फायदे:१८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे वार्षिक फक्त ४३६ रुपयांच्या प्रीमियममध्ये २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.मृत्यूनंतर कुटुंबियांना थेट आर्थिक मदत दिली जाते.

अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बँकेस/शाखेस भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

vishwatmaklokswamivarta

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

vishwatmaklokswamivarta

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात प्रभावी लढाठाणे जिल्ह्यात १४–१५ वयोगटातील सर्व मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण राबविणार

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध..

vishwatmaklokswamivarta

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार.