vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ आणि त्याच्या उपकंपनी मार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याण, विकास आणि उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी केले आहे.

इतर मागासवर्गीयांच्या कल्याण, विकास व उन्नतीसाठी विविध कर्जयोजना राबविण्यासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिप्ली महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णूपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, कौशल्य प्रशिक्षण विकास, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा अशा सहा योजना सुरू आहेत. यापैकी कौशल्य प्रशिक्षण विकास आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा या योजना पूर्णतः ऑनलाइन आहेत. अर्ज www.msobcfdc.org वर करणे बंधनकारक आहे.

बीजभांडवल योजना आणि थेट कर्ज योजना ऑफलाइन असून त्यासाठीचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूलजवळ, दुसरा मजला, खोकडपुरा येथे असलेल्या जिल्हा कार्यालयाशी ०२४०-२३४१५४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धआधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट महसूल कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा