vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध..

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध..

सातारा प्रतिनिधी: सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या विशेष सहकार्याने आयोजित राज्य महोत्सवानिमित्त शाहू कला मंदिर येथे ऐतिहासिक महानाट्य ‘रणरागिणी ताराराणी’ चे भव्य सादरीकरण उत्साहात पार पडले.

शाहुकला मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार समीर यादव, पंकज चव्हाण यांच्यासह सातारा शहरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रारंभी मान्यवरांच्या श्रीगणेश पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रेक्षकांशी संवाद साधून राज्य महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.

युवराज पाटील लिखित व विजय राणे दिग्दर्शित या महानाट्यात तब्बल ५० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. ताराराणींच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण पाहून रसिक भारावून गेले. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सादरीकरणाला दाद दिली. तसेच याचसोबत स्थानिक कलाकारांनी सादर केलेले ‘भक्ती रेपोस्ट’ हे संगीतमय कार्यक्रम देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

0000

संबंधित पोस्ट

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा;कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत शिवकालीन शस्त्रे व वंदे मातरम् प्रदर्शनीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांच्या हस्ते उद्घाटन !ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शनी पाहून पूर्वजांविषयी आदर वाढून जीवनाला पुढील दिशा मिळेल !- स्वामी दीपांकर

vishwatmaklokswamivarta

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व मार्गदर्शन सत्र> नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी> थेट मुलाखतीने निवड> विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी मार्गदर्शन मिळणार