vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा;कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा;कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्य प्रतिनिधी: धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी (दि.५ फेब्रुवारी) मंत्रालयात धुळे नंदुरबार पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता, सह सचिव बी.जी.पवार, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे धुळे व नंदुरबारचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, १०० दिवस कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी, कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची कामे ‘मिशन मोड’ वर करावी

उन्हाळ्याचे दिवस लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात प्रत्येकाला पिण्याचे पाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे. त्यात नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. यासाठी ग्रामीण भागात जल जीवन मिशन, पाणी पुरवठा विभागांतर्गत सुरु असलेली पाणीपुरवठ्याची कामे ‘मिशन मोड’ वर दर्जेदार करावीत, असे निर्देश मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी दिले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.0000

 

मोहिनी राणे/ससं/

संबंधित पोस्ट

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन कर्मचारी समाधान शिबिरासाठी माहिती तात्काळ सादर करा -जिल्हाधिकारी 

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…