vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची- सांस्कृतिक कार्यमंत्री अड.आशिष शेलार

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची- सांस्कृतिक कार्यमंत्री अड.आशिष शेलार

 

मुंबई, प्रतिनिधी : देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अल्प सैनिकांसह प्रकाशाच्या वेगाने चपळता दाखवून मराठा लाईट इन्फंट्रीने अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला, त्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्री 4 फेब्रुवारी हा दिवस “मराठा दिन” म्हणून साजरा करत आहे. ही सर्व महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी काढले.

मराठा लाईट इन्फंट्रीला 256 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच बेळगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार श्रीमती जोल्ले, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, टपाल विभागाच्या संचालक व्ही. तारा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच यावर्षी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीच्या “मराठा दिन” या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मराठा लाईट इन्फंट्री ही देशाचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक करून, देशात व देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. 4 फेब्रुवारी 1670 रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांनी असीम पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला होता. या घटनेचे स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम उलगडवून दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले.000

संबंधित पोस्ट

विधान परिषद लक्षवेधी सूचना :चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे अधिकार केंद्र शासनास- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी