vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी,नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी,नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी: उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या कुंभमेळ्यातील आपत्कालीन स्थितीत प्रयागराज कंट्रोल रुम टोल फ्री क्रमांक 1920, दुरध्वनी क्रमांक 0522-2237515 उपलब्ध केला आहे. तसेच मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्या संपर्क क्रमांक 022-22027990 असा आहे. त्यासोबतच अमरावतीचे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 0721-2661364 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यासह जिल्हा पोलीस नियत्रंण कक्षाने. 07262-242400 तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक 07262-242683 हा उपलब्ध केला आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..

लंबित प्रस्तावांना8 डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पायाभूत सुविधांच्या कामांकरिता युनिक आय डी क्रमांक मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा.

vishwatmaklokswamivarta