vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

 

मुंबई, प्रतिनिधी –

पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी टूर्सचे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. ‘केसरी टूर्स’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहचवली. या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.000

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..

जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

विधानसभा प्रश्नोत्तर :आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देईल : पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta