vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

रायगड, प्रतिनिधी :- वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याची माहिती सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन HSRP ची भूमिका लक्षात घेऊन राज्य शासनाने दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला असून अशा जुन्या वाहनांना बसविणे बंधनकारक आहे. दि.01 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादका मार्फतच हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

ज्या वाहनधारकांची वाहने 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेली आहेत अशा सर्व संबंधित वाहन मालकांनी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https::transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्याबाबत नोंदणी करावी.

या कामासाठी परिवहन विभागाने 3 कंपन्यांची नेमणूक केली असुन त्यांच्यामार्फतच (HSRP) लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडुन लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होऊ शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरीता दि.30 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करावी. याविषयी काही तक्रारी किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर अथवा dytccomp.tpt-mh@gov.in या इ-मेल वर संपर्क करावा.

तसेच वाहनधारकांची गैरसोय व कार्यालयातील होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहनधारकांनी ज्या वाहनधारकांचा मोबाइल नंबर वाहन प्रणालीवर नोंद नसेल अशा वाहनधारकांनी त्यांचे स्वतःचे ई-मेल वरुन या कार्यालयाच्या ई-मेल rto.46-mh@mah.gov.in वर मेल करुन आपले ई-आधारकार्ड व वाहन नोंदणी पुस्तक जोडून मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी अर्ज करावा.000000

संबंधित पोस्ट

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…

उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे· महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचा मेळावा संपन्न· गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार· विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण  · जिल्हा कोषागार कार्यालयाच्या ‘जिजाऊ’ सभागृहाचे उद्घाटन

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह यांनी आज नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली