vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ३६ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या तीन भामट्यांना अटक 

प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ३६ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या तीन भामट्यांना अटक

मुंबई: प्रतिनिधी

रविश पदमनाभ हेब्बर, वय ५२ वर्षे यांचा इलेक्ट्रीक मोटरसाठी लागणारे गिअर बॉक्स यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय असून आफ्रिका खंडातील घाना या देशाचे शासकीय यंत्रणेला लागणारे इलेक्ट्रीकल मोटर गिअरबॉक्सचे टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवून प्रोसेसिंग फीच्या नावाने वेगवेगळ्या बँकेच्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगुन रविश पदमनाभ हेब्बर, यांची एकुण ३६,६२,४०७- रूपयांची फसवणुक केली असून दिनांक १८/१२/२०२० रोजी ते दिनांक ०९/०२/२०२१ दरम्यान सदरची घटना घडली असून ह्या बाबत पूर्व विभाग सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक १६/२०२१ कलम ४१९, ४२०, ३४ भादविसंसह, कलम ६६(क), ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता

 

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान फिर्यादी यांची फसवणुक करण्यासाठी वापरलेले वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती प्राप्त करण्यात आली. तसेच सदर खात्यांवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या बँकांकडून अधिक माहिती प्राप्त केली असता आरोपींनी वेगवेगळ्या बँकांमध्ये क्वालीटी एंटरप्रायझेस व सिटी एंटरप्रायझेस या फर्मच्या नावाने बॅक खाती उघडल्याचे दिसून आले. प्राप्त बँक खात्यांवरील व्यवहारांचा अभ्यास करुन व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी वाशी, नवी मुंबई येथील ए.टी.एम. मधून पैसे काढण्यास येत असल्याची माहिती प्राप्त झाली.

 

सदर परिसरात पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने सापळा रचून एका संशयीत आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडून इतर ३ आरोपींची ओळख पटवून त्यांनाही ताब्यात घेवून अटक करण्यात आली.गुन्ह्यात अटक केलेले आरोपी हे छत्तीसगढ व बिहार राज्यातील असून ते नवी मुंबई मध्ये खोली भाड्याने घेवून  राहत होते

संबंधित पोस्ट

10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि अन्य तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल, त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर तुरुंगातील स्थानिक डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.

vishwatmaklokswamivarta

सायन पोलिस ठाण्याची मोठी कारवाई – हरियाणातील वैद्यकीय वितरकाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक, ६.३१ लाख रुपयांची औषधे जप्त..

औरंगाबाद येथे नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चौघांवर गुन्हा

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सायबर पोलिस विभागाचा इमेल हॅक करून सर्व शासकिय ईमेल पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई सायबर विभागाचे ईमेल हॅक…

vishwatmaklokswamivarta

ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजा तस्कारी करणार्‍या *दोघांना *८ लाख ५४ हजार रुपयांच्या 34 किलो गांजासह अटक

vishwatmaklokswamivarta