vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ३६ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या तीन भामट्यांना अटक 

प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ३६ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या तीन भामट्यांना अटक

मुंबई: प्रतिनिधी

रविश पदमनाभ हेब्बर, वय ५२ वर्षे यांचा इलेक्ट्रीक मोटरसाठी लागणारे गिअर बॉक्स यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय असून आफ्रिका खंडातील घाना या देशाचे शासकीय यंत्रणेला लागणारे इलेक्ट्रीकल मोटर गिअरबॉक्सचे टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवून प्रोसेसिंग फीच्या नावाने वेगवेगळ्या बँकेच्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगुन रविश पदमनाभ हेब्बर, यांची एकुण ३६,६२,४०७- रूपयांची फसवणुक केली असून दिनांक १८/१२/२०२० रोजी ते दिनांक ०९/०२/२०२१ दरम्यान सदरची घटना घडली असून ह्या बाबत पूर्व विभाग सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक १६/२०२१ कलम ४१९, ४२०, ३४ भादविसंसह, कलम ६६(क), ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता

 

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान फिर्यादी यांची फसवणुक करण्यासाठी वापरलेले वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती प्राप्त करण्यात आली. तसेच सदर खात्यांवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या बँकांकडून अधिक माहिती प्राप्त केली असता आरोपींनी वेगवेगळ्या बँकांमध्ये क्वालीटी एंटरप्रायझेस व सिटी एंटरप्रायझेस या फर्मच्या नावाने बॅक खाती उघडल्याचे दिसून आले. प्राप्त बँक खात्यांवरील व्यवहारांचा अभ्यास करुन व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी वाशी, नवी मुंबई येथील ए.टी.एम. मधून पैसे काढण्यास येत असल्याची माहिती प्राप्त झाली.

 

सदर परिसरात पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने सापळा रचून एका संशयीत आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडून इतर ३ आरोपींची ओळख पटवून त्यांनाही ताब्यात घेवून अटक करण्यात आली.गुन्ह्यात अटक केलेले आरोपी हे छत्तीसगढ व बिहार राज्यातील असून ते नवी मुंबई मध्ये खोली भाड्याने घेवून  राहत होते

संबंधित पोस्ट

पुणे जिल्ह्यातील अज्ञात महिलेचे मृतदेह, पोलिसांचा शोध सुरू

महाराष्ट्तील पुना सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट पोलिसांनी केला पर्दाफाश…

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षादलाच्या जवानांना यश

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;21.88 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर चालत्या गाडीतच खून..

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीर : चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक; पोलिसांवर हल्ल्याचा होता कट