vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

 

    मुंबई : प्रतिनिधी

धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त (Tax-Free) करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. या विषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मान. मुख्यमंत्री, मान. सांस्कृतीक कार्यमंत्री आणि मान. महसूलमंत्री यांना देण्यात आले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि प्रखर राष्ट्र-धर्म निष्ठेची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो.

    छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झाले आणि त्यांच्या शौर्याने प्रखर स्वदेशप्रेम आणि धर्मनिष्ठेचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाच्या कथेला जिवंत करतो. महाराष्ट्र सरकारने पूर्वी ऐतिहासिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणार्‍या महाराष्ट्रातील महायुती शासनाने ‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची आवश्यकता आहे. चित्रपटाचे दर कमी झाल्यास महाराष्ट्रातील समस्त युवक, विद्यार्थी आणि सामान्य जनता या चित्रपट पाहू शकेल. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचेल. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन होईल. भविष्यातही असे ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते प्रेरित होतील, असेही समितीने आपल्या पत्रात म्हटले आहे.श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.संपर्क : ९९८७९ ६६६६६)

संबंधित पोस्ट

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथीपहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

महाराष्ट्र राज्यासह कोकण किनारपट्टी आणि उत्तर भारतात गुलाबी थंडीचा जोर वाढला..

vishwatmaklokswamivarta