vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा ‘फितुरांना’ निर्वाणीचा इशारा

मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा ‘फितुरांना’ निर्वाणीचा इशारा

मुंबई प्रतिनिधी-राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच गोपनीय माहिती बाहेर येत असल्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस ? यांनी सर्व मंत्र्यांना यापुढे कोणतीही माहिती अगोदरच बाहेर फुटल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच  संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेची(अजेंडा) माहिती वृत्तवाहिन्यांवरुन चालवली जाते. यामध्ये त्या दिवशीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय होणार, याची तपशीलवर माहिती होते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बहुतांश मंत्रिमंडळ बैठकीत काय घडणार, याची माहिती सर्वांना असते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलल्याचे समजते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय किंवा अजेंड्याची माहिती यापुढे बाहेर फोडू नये. तसे घडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला आहे. बैठकीआधीच माहिती बाहेर फोडण्याची पद्धत चुकीची आहे. कार्यक्रमपत्रिका गुप्त असते. मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमध्ये काही लपवण्यासारखे नसले तरी काही रुढ संकेत असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनीही खपासाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच निर्णयांची माहिती दाखवू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केली.

डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा,राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीपूर्वी महायुती सरकार डान्सबारसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. याबाबत नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार डिस्को आणि ऑक्रेस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात ही बदल करण्यात येणार आहे. डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको, डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही, बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर असावे, ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही, बारबालांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे, अशा नियमांचा या नव्या कायद्यात समावेश असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ बैठकीतील या संभाव्य निर्णयाचे सर्व तपशील प्रसारमाध्यमांना आधीच मिळाले होते. ही माहिती बाहेर येताच त्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सगळ्या प्रकारामुळे देवेंद्र फडणवीस चिडल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्सबारसंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभसाठी सर्वांचे योगदान आवश्यक : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामांचे भूमीपूजन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

vishwatmaklokswamivarta

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल..

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta