vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उमेद मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

उमेद मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

 

सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आवारातील गाळ्यात उमेद मार्ट सुरु करण्यात आले आहे. या मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, मनोज राजे, संजय निकम, सुनिल सूळ, रंजनकुमार वायदंडे, सुरज पवार आणि सर्व तालुका अभियान व्यवस्थापक याप्रसंगी उपस्थित होते.

उमेद मार्टमध्ये जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी बचत गटांनी उत्पादित दर्जेदार मालांची खरेदी करावी व बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले

0000

संबंधित पोस्ट

वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे आवाहन

दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम

नरक चतुर्दशी-दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सबंध भारत देशातच नव्हे तर जगात..

vishwatmaklokswamivarta

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे..