vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ; सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ; सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: राज्य शासनामार्फत राज्यातील सहकार चळवळीच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना दरवर्षी सहकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते. आर्थिक वर्ष 2023-24 या कालावधीतील कामगिरीच्या आधारे संस्थांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर कालबद्ध कार्यक्रमात अंशतः बदल करण्यात आला असून 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे. इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

पुरस्काराबाबत सविस्तर माहिती व अर्ज नमुना http://sahakarayukta.maharashtra.gov.in या सहकार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सर्व सहकारी संस्थांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील 

vishwatmaklokswamivarta

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता,उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी

vishwatmaklokswamivarta