vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याचा वापर करावे. बदलत्या हवामान परिस्थिती आणि बाजारातील बियाण्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता, स्वतःचे बियाणे जपून ठेवणे ही शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची बाब ठरत आहे. सर्व शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरच्या बियाण्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

घरच्या बियाण्याचे फायदे : बाजारातील महागड्या बियाण्यांचा खर्च टाळता येतो. स्थानिक हवामान व जमिनीस अनुरूप बियाण्यांची उगमशक्ती चांगली राहून गुणवत्तेबाबत सुनिश्चिता असते. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर शेती करता येते. स्थानिक, पारंपारिक व दुर्मिळ वाण टिकवता येतात.

बियाणे साठवताना योग्या काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्याची उगवण क्षमता व किडींपासून सुरक्षित राहण्यासाठी निरोगी व रोगमुक्त झाडांपासूनचे बियाणे निवडावे, बियाणे नीट स्वच्छ करून, त्यातील ओलावा पूर्णपणे काढून वाळवावेत. बियाणे हवाबंद डबे, पोती किंवा मातीची भांडी यामध्ये कोरड्या, थंड व अंधाऱ्या ठिकाणी ठेवावेत. किंड नियत्रंणासाठी कडुलिंबाचा पाला किंवा राख याचा वापर करून नैसर्गिक संरक्षण करावे. बियाण्यांवर वाणाचे नाव व साठवण्याची तारीख लिहा.

प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होईल.

00000

संबंधित पोस्ट

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

राममूर्ती ता.जालना येथील अनेक शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात… 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून #शेती समृद्ध करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लालवंडी येथे पीक अवशेष व्यवस्थापन व ‘सबसॉइलर’ तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक; खरीप हंगाम पूर्व गाव मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

युवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta