vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि  मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

नवी दिल्ली प्रतिनिधी-आज दिल्लीच्या रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाचा शपथ समारंभ झाला भाजपा विद्यमान आमदारांना रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न झाला

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.यावेळी रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणे ही राजधानीतील सर्व 48 भाजप आमदारांची जबाबदारी आहे. आम्ही महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण करू. 8 मार्चपर्यंत महिलांना त्यांच्या खात्यात 100 टक्के आर्थिक मदत मिळेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासोबत परवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज सिंग यांना उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी पदाची शपथ दिली. 27 वर्षानंतर भाजपा सरकार सत्तेमध्ये आले आहे

 नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी, मुख्यमंत्रीपदी निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन पाळण्यासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप सरकार दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करेल. मासिक मदतीचा पहिला हप्ता 8 मार्चपर्यंत त्यांच्या खात्यात जमा केला जाईल असं आश्वासन, रेखा गुप्ता यांनी दिलं आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभासाठी- ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

🏆 २१ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ संपन्न

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम;राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

अतिवृष्टीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्तकालीन यंत्रणा मदतीसाठी सज्ज,काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत