vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशव्यवसाय

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खते मंत्रालय, भारत सरकारचीची एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिक्स उद्योगांना तांत्रिक सहायत्ता पुरवणे, या उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करणे तसेच शंशोधन व विकासकामात सहायता करणे या उद्देशाने छत्रपती संभाजी नगर येथे सिपेट केंद्राची स्थापना 2006 मध्ये करण्यात आलेली आहे. सिपेट संस्था आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त असून या संस्थेमध्ये एआयसीटीई मान्यताप्राप्त तसेच एमएसबीटीई समतुल्य प्लास्टिक्स इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम चालविले जातात.

सिपेट मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेवलची सिपेट ॲडमिशन टेस्ट (कॅट) घेण्यात येते व गुणवत्ते नुसार प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून, सिपेट च्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी https://cipet25.onlineregistrationform.org/CIPET/ या संकेत स्थळावर सुरु झालेली आहे. सदरील प्रवेश परीक्षा हि ८ जुन २०२५ रोजी घेण्याचे प्रयोजन असून परीक्षेसाठीचे प्रवेश अर्ज २९.०५.२०२५ पर्यन्त सादर करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावी, डीप्लोमा व बी.एस.सी (शेवटच्या वर्षाची) ची परीक्षा दिलेली आहे असे सर्व विद्यार्थी, निकाल लागण्याची वाट न बघता प्रवेश अर्ज भरू शकतात. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख मिलिंदकुमार भरणे यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.

सिपेट छत्रपती संभाजी नगर येथे जागतिक दज्याचे सुसज्ज असे कॅड / कॅम, टूल रूम, प्लास्टिक प्रोसेसिंग, प्लास्टिक टेस्टिंग विभाग असून ज्यातील आधुनिक मशिनरीज द्वारे प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्यता दिली जाते तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. सिपेटचे सर्व अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगाराच्या उद्देशाने तयार केलेले असून प्रॅक्टिकल आधारित संकल्पाने मुळे येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (डीपीटी), डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (डीपीएमटी) हे तीन वर्षाचे कोर्स चालविले जातात व बी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग & टेस्टिंग (पीजीडी-पीपीटी) हा २ वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला असेल अश्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन (पीडी-पीएमडी) हा १८ महिन्याचा कोर्स करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर होतकरू विद्यार्थ्यांना प्लास्टिक्स इंजिनीयरिंग मध्ये आपले उज्वल भविष्य घडवता येईल व त्यांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ९३७३६८७९१५ ९३२५६८७९०२, ०२४०-२४७८३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

*****

संबंधित पोस्ट

नांदेड – मुंबई व टनकपूर – नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा टनकपूर – पिलीभीत रेल्वे सेवेचा शाहजहानपूरपर्यंत विस्तार

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

गौण वनोपजांकरिता वाहतूक परवानाबाबत कार्यपद्धती निश्चित* 

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

माथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी