vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले…

राज्य प्रतिनिधी

पळस्पे ते कशेडी घाट रस्त्याची केली पाहणी रायगड – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली कामे, त्यामध्ये होत असलेली दिरंगाई,जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तरी सर्व संबंधित यंत्रणानी महामार्गचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्य

.मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली. हा महामार्ग एकूण १२ टप्प्यांत विकसित होत आहे.एकूण ४३९.८८ किमीपैकी पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या २८१ किलोमीटरच्या पल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत..सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाच्या अधिका-यांकडून त्यांनी या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, त्यासाठी आवश्यक बाबी यांची त्यांनी माहिती घेतली. ही कामे लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिका-यांनी परस्पर समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करावेत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी यावेळी दिल्या.

या पाहणी दौऱ्यात मंत्री श्री भोसले यांनी पलस्पे फाटा, पेण, वाशीनाका,गडब,आमटेम,नागोठणे, कोलाड,इंदापूर, माणगाव,लोणारे रोड या विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत,

प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार धर्यशील पाटील,आमदार रवींद्र पाटील, सा. बा .(एन एच) मुख्य अभियंता श्री शेलार, मुख्यव्यवस्थापक अंशुमानी श्रीवास्तव,प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, अधीक्षक अभियंता रा. म.,श्रीमती तृप्ती नाग, सा. बा. अधीक्षक अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड,कार्यकारी अभियंता श्री सुखदेवे, श्री नामदे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री भोसले म्हणाले की,महामार्गावर ज्या ठिकाणी पुलांची कामे चालू आहेत त्याठिकाणी सर्व्हिस रोड नीटनीटके व वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी व पुढे गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होणार नाही. इंदापूर व माणगाव बायपास पुलाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. मार्च महिन्यात काम चालू होईल. महामार्गचे काम करतांना ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ट राहील याची विभागाने तपासणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी संबंधित सर्व यंत्रणानी दर्जेदार व विहित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.परस्पर समन्वय साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबैठकीत उड्डाणपूल, सर्विस रोड, गटारे, पावसाळ्यात तुंबणारे पाणी, वाहतूक कोंडी, पथदिवे यांसह विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संबंधित पोस्ट

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’ला ऐतिहासिक उड्डाण मुख्यमंत्र्यांकडून विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार· दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस…

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन