vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : – मा.ना.श्री. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मधील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र व किमान १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३५ वाजता, मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री (नगर विकास), मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री (अर्थ), मा. ना. चंद्रकांत पाटील मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, मा. ना. श्री. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, मा. ना. श्री. जयकुमार गोरे, मंत्री ग्रामविकास व पंचायतराज, मा. ना. डॉ. निलम गो-हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद, मा. ना. श्री. योगेश कदम, राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज, मा. ना. श्रीमती माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, नगर विकास व सामाजिक न्याय, मा. श्रीमती सुजाता सौनिक (भा.प्र.से) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य व मा. श्री. एकनाथ डवले, प्रधानसचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग उपस्थित राहणार आहेत.

या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील पुणे जिल्ह्यातील सुमारे ६००० लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले असून राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरण करण्यात येणार असून त्याबरोबरच प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ मधील राज्यातील १० लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. मा. मंत्री, ग्राम विकास व पंचायत राज यांच्यामार्फत सर्व जिल्हयांचे मा. पालक मंत्री, सर्व तालुक्यांचे मा. आमदार, सर्व ग्राम पंचायतींचे सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी व लाभार्थी यांना या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या साधारणपणे दीड तास अगोदर राज्यातील सर्व जिल्हास्तरांवर मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली ५०० लाभार्थी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात घरकुल बांधकामाबाबत उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल व लाभार्थी यांना मंजूरी पत्र वितरित करण्यात येणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रम पाहण्यासाठी NIC च्या मदतीने VC सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात घरकुल बांधकामाबाबत उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल व या कार्यक्रमामध्ये लाभार्थी यांना मंजूरी पत्र वितरित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यस्तरावरील कार्यक्रम पाहण्यासाठी NIC च्या मदतीने २ way Live Streaming उपलब्ध आहे.

कार्यक्रमाच्या साधारणपणे दीड तास अगोदर ग्रामपंचायतस्तरावर संबंधित सरपंच यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करून १०० लाभार्थी /लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायतस्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेटची व्यवस्था करण्यात येत असून, जेणेकरून लाभार्थी व ग्रामस्थांना राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. या कामी ग्रामपंचायत/प्राथमिक शाळा/माध्यमिक शाळा/प्राथमिक आरोग्य केंद्र/इतर संस्था यांची मदत घेण्यात येत आहे. मंजुरी पत्र वितरण व हप्ता वितरण कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी व त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याची प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त निरीक्षक ह्यांनी ग्रामपातळीवरील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, कृषीसहाय्यक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेवीका यांचे बरोबर संबंधीत लाभार्थी व त्यांचे कुटूंब यांच्या उपस्थितीचे नियोजन करत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ८४१० फुट साईजचा फ्लेक्स बोर्ड लावण्यात येत आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांची नावे नमूद करण्यात येतील. (उदाः जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, लाभार्थ्यांचे नाव, मंजूरी वर्ष, लाभार्थ्याचा आवास ID). सर्व प्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध पैलू जसे की, घरकुल बांधकाम प्रगतीच्या टप्पा निहाय निधी वाटप प्रक्रिया, बांधकाम साहित्याची उपलब्धता, घरकुल बांधकाम आराखडा, इ. बाबत लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. या कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरण करण्यात येईल.सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त खिडक्या- खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार