vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन छेडणार -माजी खासदार हरिभाऊ राठोड   

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन छेडणार -माजी खासदार हरिभाऊ राठोड

 

मुंबई प्रतिनिधी सुरेश गायकवाड –

मुंबई- महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून दिल्याने ते बेरोजगार युवकांनी या प्रशिक्षण कालावधीत विविध शासकीय विभागात कार्यरत राहून आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडीत संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे आपले काम पार पाडले आहे. परंतु या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी सहा महिन्याचा असल्याकारणाने फेब्रुवारीमध्ये हा कालावधी संपल्यानंतर ते सर्व युवक बेरोजगार होणार असल्याची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. अशा प्रशिक्षणार्थीना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहिर केल्याप्रमाणे यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले होते याची आठवण करून देण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले, परंतु सरकारने अद्यापही निर्णय घेतला नाही.

त्यामुळे संपूर्ण राज्यभर असणाऱ्या या युवक-युवतीमध्ये सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. तरी सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून किमान त्यांचा कालावधी वाढवून आहे, त्या आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत विचार करावा. मंत्रालयीन स्तरावर प्रशिक्षणर्थ्यांचा कालावधी वाढविण्याबाबत चर्चा आहे, परंतु जोपर्यंत जीआर निघत नाही तोपर्यंत युवक मानण्यास तयार नाही, येणाऱ्या दोन दिवसात शासनाने जीआर काढावा, अन्यथा येणाऱ्या काळात राज्यभर हे युवक – युवती संविधा निकरित्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड, तसेच सामाजिक नेते बालाजी चाकूरकर पाटील यांनी आज मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मुदत वाढीसह समायोजनाकरिता आणि मानधनात वाढ करण्याकरिता होत असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाची रूपरेषा अशी असेल – संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा धडक मोर्चा दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वा मुंबई येथील आझाद मैदानावर धडकेल, सकाळी ११ वा लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर १०१ प्रशिक्षणार्थीसह आमरण उपोषणास प्रारंभ करतील. आझाद मैदानावरील उपोषणास पाठींबा म्हणून महाराष्ट्रातील सर्व तहसिल कचेरी समोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी दररोज धरणे आंदोलन करतील. आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी १० मार्च २०२५ रोजी सोमवारी उपोषणाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर १ हजारपेक्षा जास्त प्रशिक्षण घेतलेले युवक मुंडण करून निषेध नोंदवतील. उपोषणाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच १२ मार्च २०२५ रोजी बुधवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास स्थानाला घेराव घालतील. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी म्हणजेच १७ मार्च २०२५ रोजी सोमवार सकाळी अकरा वाजता आंदोलन करते प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थी मुंबई येथील मंत्रालयाला घेराव घालतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

लातूर जिल्ह्यातील ‘नीट’ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

नववर्ष स्वागत : उपाहारगृहांना सूचना’एफडीए’ची ‘नववर्ष संकल्प- सुरक्षित अन्न मोहिम’

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ यशस्वीरित्या पार पडली

vishwatmaklokswamivarta