vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन.. 

माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन..

        सांगली, प्रतिनिधी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील हे एक विद्यापीठ होते. त्यांचे विचार आजच्या काळातही नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  येथे केले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्य मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, शैलजा पाटील, जयश्री पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी, पाटील कुटुंबिय आदि उपस्थित होते.

   माजी मुख्यमंत्री पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारक म्हणून योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय भूमिकेत आल्यानंतरही त्यांनी आपली तत्वे, मूल्ये जपली. ते सर्वसामान्य माणसाला आपले करणारे नेतृत्व होते. वर्षानुवर्षे ज्यांच्या स्मृती पुसल्या गेल्या नाहीत, असे वसंतरावदादा यांचे नेतृत्व होते. शिक्षणासाठी दक्षिणेला जाणारा ओढा त्यांनी विनाअनुदानित महाविद्यालये सुरू केल्याने थांबला. आजही राजकारणात त्यांचे अनेक दाखले दिले जातात, असे त्यांनी सांगितले.

 प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.00000

संबंधित पोस्ट

साई नगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

vishwatmaklokswamivarta

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

थोरियम अणुभट्टी विकासासाठी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार..

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..