vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

साई नगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

 साईनगरी शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा काय म्हणाले ते पहा-

 

 राज्य प्रतिनिधी –

साईबाबाची नगरी शिर्डी येथे भाजपाचे महा विजय प्रदेश अधिवेशन आयोजित करण्यात आले या प्रसंगी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव नियुक्त कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण अनेक मंत्री पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अमित शहा यांनी अभिवादन केले.

यावेळीअमित शहा म्हणाले, आज महाराष्ट्रातील महाविजयानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत. तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठे कार्य केले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. आपले सोबतचे घटक पक्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीला देखील मोठे यश मिळाले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला 20 फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते, 2019 ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले आहे.

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आपले विरोधक वाट बघत बसले होते की महाराष्ट्रात आता आपले सरकार येणार आहे. त्यांचे हे स्वप्न सुद्धा आपण सर्वांनी मिळून धुळीस मिळवले. मी जेव्हा आलो होतो साडे 9 हजार कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला होता. काही निवडणूक असे असतात जे देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. महाराष्ट्र सरकारने हे करून दाखवले आहे. या सगळ्याचे शिल्पकार म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा प्रणाम.महाराष्ट्राच्या जनतेने मोदींच्या विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला

तुम्ही पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. काही जणांना उमेदवारी नाही मिळाली, पण सर्वांनी मिळून महायुतीला निवडून देण्याचा निश्चय केला होता. महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले की एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींच्या विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला आहे.

संबंधित पोस्ट

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

कन्या सन्मान दिवस-मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला- पालकमंत्री संजय शिरसाट

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू–जनकपूर प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू