vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सव सुरू..

सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सव सुरू..

 

 सांगली, प्रतिनिधी : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय लावणी महोत्सव २०२५ मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे सुरू झाला. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक संचालक संदीप बलखंडे, माजी कार्यक्रम अधिकारी मच्छिंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा लावणी महोत्सव मिरज येथे दिनांक 1 ते 3 मार्च 2025 या कालावधीत बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात राज्यातील विविध लावणी कलापथक आपली कला सादर करणार आहेत.

स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक सुरेश आवटी यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 हा लावणी महोत्सव प्रेक्षकासाठी विनामूल्य असून याचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती; राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

रेल्वे स्टेशन जामा मशीद येथे दावत – ए- इफ्तारचा.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती.

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले