vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्ला आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्ला आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

राज्य प्रतिनिधी –

छत्रपती संभाजीनगर,  जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकारी – कर्मचाऱ्यांची दिवसभर आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच सायंकाळी तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून त्यांना आरोग्य सल्लाही देण्यात आला. महिला ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ असून सर्व कुटुंबाच्या आरोग्याबरोबरच त्यांनी स्वतःचे आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्यावे. योगा प्राणायाम, योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे केले.

  जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विषयक मार्गद्शनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.ज्योती शेवगण- बिराजदार, आहार तज्ज्ञ डॉ.स्वप्नाली पिंपळे, दंतशल्य चिकित्सक डॉ.अमृता पवार, गौरी देशपांडे, डॉ.रेणुका लोया या उपस्थित होत्या. अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड , डॉ.सुचिता शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे,माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.  जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात व त्याचा परिणाम त्यांच्या कार्यशैलीवर आणि आरोग्यावर होत असतो. तो होवू नये म्हणुन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ द्यावा. शरीर आणि मन सुदृढ राखून कार्यक्षमता वाढवण्यासाठी आरोग्य उत्तम ठेवावे. व्यायाम, प्राणायाम, आरोग्य तपासणी, पौष्टिक आहार आणि इतर आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.  डॉ.ज्योती बिराजदार यांनी सांगितले की, महिलांचे आरोग्य हे त्यांच्या हार्मोनल संतुलनावर अवलंबून असते. तर हे संतुलन राखण्यासाठी योग्य ती काळजी ,आहार आणि आरोग्य तपासणी वेळेवर करून घेणे आवश्यक आहे विविध आजारांची माहिती स्त्रीरोगतज्ञ म्हणून मार्गदर्शन यांनी केले. डॉ. स्वप्नाली पिंपळे यांनी महिलांचा आहार आणि आहारामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या घ्याव्यात या विषयाचे मार्गदर्शन केले. यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणे ऋतूनुसार आवश्यक असलेले फळ,भाज्या आणि योगासने, प्राणायाम याचे महत्त्व अधोरेखित केले  दंतरोग चिकित्सक डॉ. गौरी देशपांडे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी घेत असताना दाताची काळजी व तपासणी याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.रेणुका लोया यांनी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून महिलांची आरोग्य तपासणी करून यावर उपचारात्मक मार्गदर्शन केले .  प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांनी मानले.

०००००

संबंधित पोस्ट

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त भरगच्च कार्यक्रम–गुरू गणेश भवनमध्ये स्वीकारणार शुभेच्छा …

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु♦️२०२५ – २६ च्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या सादर 

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात मीटर आधारित टॅक्सी सेवेसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

न नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद ! अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश