vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

विशेष प्रतिनिधी- स्त्री म्हणजे मातृत्वाचा झरा. स्त्री म्हणजे वात्सल्याचं प्रतिक अन् स्त्री म्हणजे त्यागाची मूर्तिमंत देवताच होय. स्त्री ही दोन विभिन्न कुटुंबातील सेतू असून, ती प्रत्येक युगात सातत्याने कुटुंबासाठी चंदनासारखं झिजत असते. स्त्री ही, कन्या, बहीण, पत्नी, माता अशा विविध भूमिकेतून कुटुंबाच्या उन्नतीकरिता आपलं भरीव योगदान देत असते. एवढं करूनही तिला कौटुंबिक व सामाजिक जीवनात अनेक समस्या अन् शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हे सर्व घाव सहनशिलतेने सोसून हतबल न होता, ती आपली पुढील यशस्वी वाटचाल करत असते, याचा आम्हा पुरुषवर्गाला सार्थ अभिमान आहे. यास्तव जागतिक महिला दिनानिमित्त माता-भगिनींना त्रिवार मानाचा मुजरा!

आजच्या या महिला दिनानिमित्त- विशेष व्यक्ती विशेष प्राध्यापिका स्त्री रोग तज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके यांनी महिलासाठी महिलांकरिता स्त्रीरोग समस्या आणि निवारण यासाठी अत्यावश्यक असलेले पुस्तक स्त्रियांचे आरोग्य याचे लेखन त्यांनी केले आहे महिलांच्या विविध आजारावर लेख,गरोदर स्त्रियांच्या घ्यावयाची काळजी, याबाबत माहिती आणि मार्गदर्शन पुस्तकाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी ही माहिती यात उपलब्ध आहे श्रीमती डॉ. राजश्री कटके यांचं रिसर्च आर्टिकल गुगल सर्चवरती अजून पर्यंत दोन लाख पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्तरवर वाचले गेले आहेत.. या रिसर्च आर्टिकल च्या माध्यमातून ही अनेक रुग्णांना याचा फायदा आणि माहिती मिळत आहे.

 फक्त रुग्णसेवा नाही तर इतरही सामाजिक कामात महिलांना मोटिवेशनल आणि त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या माहिती डॉक्टर राजश्री कटके यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना पोहोचवलं आहे. स्वतःच्या जीवनात अनेक अडचणी येत असतानाही मॅडम कधीही आपली प्रवाह न करता लोकांचा मदतीसाठी सदैव तत्पर असतात. कित्येक वेळा सामाजिक कार्य करताना त्यांना स्वतःला अडचणी जावं लागतात. आज असे शेकडो रुग्ण आहे ज्यांचा आजाराचा निदान राजश्री मॅडमनी केला आहे लोक फक्त त्यांना एक डॉक्टर नाही तर देवाचं रूप ही समजतात. डॉक्टर राजश्री कटके यांनी हात लावला तर रुग्ण शंभर टक्के बरी होणार अशी लोकांना खात्री असते, रुग्णाबरोबर मॅडमचा नातं फक्त डॉक्टर पुरतच नाही तर आई आणि बहीण सारखं असतं. म्हणून तर बदली झाल्यानंतरही मॅडमला आता कुठल्या हॉस्पिटलला कामाला आहे हे शोधून माणसं भेटायला येतात,

मुंबईसह देशभरात स्त्रियांवर विविध रोगाच्या निदानाकरिता त्यांची किमया प्रसिद्ध आहे त्यांनी आतापर्यंत असंख्य जटील असलेल्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत स्त्री रोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. राजश्री दयानंद कटके यांच्याकडे अडचणीच्या जटिल समस्या असलेल्या असंख्य महिला रुग्णांचे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया याचे आव्हान त्यांनी स्वीकारून त्यांना ठणठणीत बरे केले आहेत त्यांच्या या हस्त स्पर्षाची किमया ही जादू एका देवदूताप्रमाणे जनसामान्यांना प्रचलित आहे

याबाबत माहिती अशी की नुकत्याच काही दिवसांपूर्वी,सेंट जॉर्ज रुग्णालयात यांनी यशस्वी शस्त्रक्रिया वयोवृद्ध महिलेच्या पोटातून काढला .. कलिंगडाच्या आकाराचा किलोचा गोळा,

याबाबतची माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वय वर्ष 70 आधी त्यात अर्धांग वायूचा झटका अन्य शारीरिक व्याधी असतानाही एका वयस्कर महिलेच्या पोटातून दहा किलो होऊन जास्त कलिंगडा चा गोळा यशस्वीरित्या शस्त्रक्रियेतून बाहेर काढण्यात आला राज्य सरकारच्या अख्तरीत्या तील सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे अशी दुर्मिळ शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात येऊन महिलेला जीवदान मिळाले याचे समाधान वाटते अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनायक सावर्डेकर यांनी दिली

 रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रहिवासी अनिता साळवे बदललेले नाव यांना सहा महिन्यापूर्वी अर्धांग वायूचा झटका आला होता त्यांना उच्च रक्तदाबाचा ही त्रास होता अशातच महिन्याभरापूर्वीपासून त्यांच्या पोटाचा आकार वाढू लागला होता त्यामुळे पोटदुखी श्वास घेण्याच्या अडचणी आणि हृदयाची गती देखील कमी झाली होती. पोटाचा आकार वाढू लागल्याने त्यांनी जवळपासच्या रुग्णालयामध्ये तपासणी केली. मात्र अन्य सह व्याधीमुळे शस्त्रक्रिया दरम्यान अडचण निर्माण तील या भीतीने डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला होता. अखेर महिलेच्या मुलाने तिला राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. सोनोग्राफी सिटीस्कॅन एम.आर.आय मेंदू एम.आर.आय  टूडीको, यासारख्या तपासण्या करण्यात आल्या त्यात हा गोळा दहा किलो होऊन जास्त वजनाचा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले प्राध्यापक व प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉक्टर राजेश्री कटके यांनी याआधी शेकडो जटिल शस्त्रक्रिया केल्या होत्या. तरीही ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया एक आवाहन होते आपल्या अनुभवाच्या जोरावर ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला भूलतज्ञ डॉक्टर रिचा ऋचा यांनी शस्त्रक्रियेपूर्वी महिलाला भूल दिली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ दोन कलिंगडाच्या सुमारे दहा किलो वजनाचा गोळा काढण्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजश्री कटके डॉक्टर कोरेश यांच्या टीमला यश आले ही शस्त्रक्रिया सुमारे चार तास चालली होती..आता रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत असून लवकरच त्यांना डिचार्ज देण्यात येईल असे स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले की, महिला विषयक जटील आणि अडचणीच्या अनेक आजाराचे निवारण करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे सर्व पर्याय संपल्यानंतर जटिल आणि अडचणीच्या यशस्वी शस्त्रक्रिया आज पर्यंत आम्ही पार पाडत आले आहोत अनेकांना यातून जीवदान मिळालेले आहे या सर्व गोरगरीब सामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव मी 24 तास उपलब्ध असते हीच माझी खरी रुग्णसेवा आणि हीच माझी खरी देशसेवा

स्त्री म्हणजे मातृत्वाचा झरा. स्त्री म्हणजे वात्सल्याचं प्रतिक अन् स्त्री म्हणजे त्यागाची मूर्तिमंत देवताच होय. स्त्री ही दोन विभिन्न कुटुंबातील सेतू असून, ती प्रत्येक युगात सातत्याने कुटुंबासाठी चंदनासारखं झिजत असते. स्त्री ही, कन्या, बहीण, पत्नी, माता अशा विविध भूमिकेतून कुटुंबाच्या उन्नतीकरिता आपलं भरीव योगदान देत असते

 यास्तव जागतिक महिला दिनानिमित्त माता-भगिनींना त्रिवार मानाचा मुजरा!

खरंच जागतिक महिला दिवस निमित्ताने डॉक्टर राजश्री कटके मॅडम यांच्यासारख्या महिलांचं मोठा योगदान आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला आणि या देशाला असंच भेटत राहावं हीच मनापासून इच्छा.

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिवस जीवनशैली म्हणून ‘योगा’चा अंगिकार करावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन!- हिंदू जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू**- खासदार उदयनराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार, पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात.. भाजपा खासदार अरविंद धर्मापुरी यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta