vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत होणार तपासणी

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत होणार तपासणी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):-जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच त्यांच्यात आढळलेल्या वैद्यकीय, मानसिक, शारिरीक समस्यांवर त्वरीत उपचार करणे यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम दि. १ पासून सुरु झाला आहे. जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या तपासणीसाठी एकूण ४२ आरोग्य पथक कार्यरत आहेत. एका आरोग्य पथकांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी स्त्री व पुरुष एक औषध निर्माता एक आरोग्य सेविका असते अशा चार कर्मचाऱ्यांचे एक आरोग्य पथक आहे. शैक्षणिक वर्षांत शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी एक वेळा केली जाते तर अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी दोन वेळा केली जाते.   जिल्ह्याचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंगणवाडी विशेष आरोग्य तपासणी कार्यक्रम

१)छत्रपती संभाजीनगर तालुक्यात एकूण ४१ अंगणवाडी व ४ शाळा ५ आरोग्य पथक.

२)गंगापूर तालुक्यात एकूण १६ अंगणवाडी ६ पथक.३) कन्नड तालुक्यात एकूण ११९ अंगणवाडी व ६ शाळा ६पथक.  ४) खुलताबाद तालुक्यात एकूण ९८ अंगणवाडी व १३ शाळा २ पथक.  ५) पैठण तालुक्यात एकूण १३४ शाळा ५ पथक.  ६) फुलंब्री तालुक्यात एकूण ४२ अंगणवाडी ३ पथक.      ७) सिल्लोड तालुक्यात एकूण ८८ अंगणवाडी ५ पथक. ८) सोयगाव तालुक्यात एकूण २१अंगणवाडी २ पथक.    ९) वैजापूर तालुक्यात एकूण ६५ अंगणवाडी ४ पथक.

महानगरपालिका शाळा व अंगणवाडी पूर्ण तपासण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. या मोहिमे मध्ये सर्व बालकाची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.विशाल बेंद्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळील आरोग्य केंद्र किंवा तालुक्यातील उपजिल्हा व रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा. अधिक माहिती साठी १०४ या हेल्पलाईनवर कॉल करावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.०००००

संबंधित पोस्ट

अकोले, कोपरगाव, संगमनेर येथील रुग्णालयांचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन ; राज्य शासनाची मान्यता,जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जपले जातेय घरेलू कामगार महिलांचे आरोग्यलाभार्थींनी मानले राज्य शासन, आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे आभार…

आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम * कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ग्रामपातळीवर नियोजन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचा अनोखा पुढाकारआश्रमशाळेतील ‘पिंक रूम’ ठरतेय आदिवासी कन्यांच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची हक्काची जागा..!