vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नंदुरबार जिल्ह्यात सर्व वाडी, पाडे व गावांना-पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार जिल्ह्यात सर्व वाडी, पाडे व गावांना-पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : अपारंपरिक वीज पुरवठ्याची नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात ३१ गावे व ८५ वाडी व पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ५ गावे, २३० वाडी व पाडे यांना अपारंपारिक पद्धतीने वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अपारंपारिक पद्धतीने वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या या सर्व गावे, वाड्या व पाड्यांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील गावांना वीज पुरवठा करण्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात गावे, वाडी व पाड्यांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये अक्कलकुवा तालुक्यात १८५ गावे, ७४९ वाडी व पाडे आणि धडगाव तालुक्यातील १३१ गावे, ९१६ वाडी व पाडे यांचा समावेश आहे.

 नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन मन योजनेतूनही निधी मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुढील दीड ते दोन वर्षात संपूर्ण गावे, पाडे आणि वाड्यांना पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येईल,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले

संबंधित पोस्ट

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …

समुद्र किनारी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण  वाचविणाऱ्या रायगड पोलीस दलातील दोन्ही पोलीस अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती ऑंचल दलाल यांनी प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव 

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे निधन झाले आहे, त्या 101 वर्षांच्या होत्या.