vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा निवेदन :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

विधानसभा निवेदन :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

 

            मुंबई, प्रतिनिधी: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातकुंड येथे झालेल्या या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंड येथे किशोर ते कन्नड बायपास जवळ १० मार्च २०२५ रोजी ऊसाचा ट्रक उलटल्यामूळे अपघात झाला. या अपघातात सहा मजूरांचा मृत्यू झाला असून ११ मजूर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तीन मजूरांवर उपचार करून त्यांना घरी सोडलेले आहे. उर्वरीत आठ मजूरांवर एम. जी. एम. हॉस्पीटल, छत्रपती संभाजीनगर व स्वराज हॉस्पीटल, चाळीसगांव या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत झालेले सर्व मजूर हे सातकुंड ता. कन्नड येथील रहिवाशी आहेत. ऊस तोडणी व वाहतुक करतांना होणाऱ्या वेगवेगळ्या अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबांस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लक्ष, अपंगत्व आल्यास २.५० लक्ष व जखमींना उपचारासाठी ५० हजारापर्यंत वैद्यकीय खर्च देण्यात येतो, असे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले

0000

संबंधित पोस्ट

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशनचे काम कालबद्धरित्या पूर्ण करा- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना विभागाचा घेतला आढावा…

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta