vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

 सांगली, प्रतिनिधी : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

 या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 20 मार्च 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 3 एप्रिल 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी,गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी..

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील

ज्ञान पोस्ट’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील-उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta