vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

“”गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 

मुंबई प्रतिनिधी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  रमजान महिन्याच्या निमित्ताने मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी, मा. अजितदादांनी राज्यातील सर्व मुस्लिम बंधू भगिनींना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

भारत हा विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊनच समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला आणि आपल्याच हाच वारसा पुढे न्यायचा आहे. लवकरच गुढीपाडवा येत आहे, नंतर रमजान ईद येईल. आपल्याला हे दोन्ही सण एकत्र आणि आनंदाने साजरे करायचे आहेत, असे मा. अजितदादा म्हणाले.

एकता, समता, त्याग, समर्पण, बंधू भाव वाढीस लावणारा हा रमजानचा पवित्र महिना आहे. रमजान हा फक्त एका धर्मापुरता सीमित नाही. तर हा महिना आपल्याला मानवता, एकता आणि बंधुभावाचा संदेश देतो. हा महिना फक्त शरीरच नव्हते तर मन आणि आत्मा देखील शुद्ध करतो, असे मा. अजितदादा यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले. तसेच, समाजातील शांती भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, मग तो कोणीही असो, असा विश्वास देखील यावेळी मा. अजितदादांनी यावेळी दिला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते मा. आ. श्री. छगन भुजबळ, पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नवाब मलिक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, मा. आ. श्री. शेखर निकम, मा. आ. श्रीमती. सना मलिक, मा. आ. श्री. रईस शेख, मा. आ. श्री. विक्रम काळे, मा. आ. श्री. चेतन तुपे, मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मा. आ. श्री. इद्रिस नायकवाडी, मा. आ. श्री. मनोज कायंदे, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, मा. श्री. मुश्ताक अंतुले, अंजुमन इस्लामचे चेअरमन मा. श्री. जहीर काजी, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मा. श्री. सोहेल खडवाणी, मा. श्री. आसिफ भामला यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश