vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

जालना, प्रतिनिधी- औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यांची दूरसंचार सल्लागार समिती बैठक पार पडली. या बैठकीत BSNL च्या सेवांबाबत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. BSNL नेटवर्कची सद्यस्थिती, टॉवर उभारणी, टेंडर प्रक्रियेत झालेल्या त्रुटी आणि नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पडताळणी यावर भर देण्यात आला

बैठकीत मागील TAC मिटिंग (फेब्रुवारी 2024) च्या इतिवृत्ताची प्रत मागविण्यात आली, तसेच BSNL च्या कामकाजात आलेल्या अडचणींवर चर्चा झाली. ठेकेदाराने औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा येथे तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कामांसाठी EPF, ESIC आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यामुळे BSNL ने बील थांबविले होते. परंतु नियमांचे उल्लंघन करत गुत्तेदारास चुकीच्या पद्धतीने बीले अदा करण्यांत आले. या संदर्भात तीन दिवसांत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश खा.डॉ.कल्याण काळे यांनी दिले

तसेच, औरंगाबाद बीए अंतर्गत OFC टाकणे व दुरुस्तीवरील खर्चाची तपासणी करण्यास सांगण्यात आले. मागील तीन वर्षांत लॉसी फायबर, रिहॅबिलिटेशन आणि नवीन केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. जालन्यात NOFN प्रकल्पांतर्गत 139 कोटी रुपये खर्च झाले, परंतु प्रत्यक्षात ही सेवा कार्यरत नाही. सध्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली फक्त बिलिंग केली जात आहे.

बैठकीत BSNL च्या नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) योजनेवर सुद्धा चर्चा झाली. हा प्रकल्प देशातील 2,50,000 ग्रामपंचायतींना फायबर नेटवर्कने जोडण्यासाठी तयार करण्यात आला होता. तसेच 1 एप्रिल 2023 पासून मेंटेनन्ससाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सध्या नेटवर्क कार्यरत नाही, त्यामुळे हा खर्च अनुत्पादक ठरला आहे.

या संदर्भात खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले –1️⃣ जालना जिल्ह्यात NOFN अंतर्गत किती ग्रामपंचायती जोडल्या गेल्या?2️⃣ त्यापैकी किती ग्रामपंचायतींमध्ये सध्या नेटवर्क सुरू आहे?3️⃣ या संपूर्ण प्रकल्पासाठी झालेला एकूण खर्च किती?4️⃣ 1 एप्रिल 2023 पासून आजपर्यंत देखभाल-दुरुस्तीवर झालेला खर्च आणि त्याचा उपयोग काय?बैठकीत हा विषय गंभीर मानला गेला आणि BSNL अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महत्त्वाचे निर्णय आणि पुढील कृती योजना:

📌 BSNL टॉवर अखंडित सुरू राहावे यासाठी खासदार मंत्री महोदयांकडे विनंती करणार आहेत.📌 जालना, औरंगाबाद व बुलडाणासाठी नविन टॉवरला मान्यता मिळालेली आहे. सदरहू टॉवरचे लवकरच काम सुरू होणार.📌 सरकारी कार्यालयांमध्ये BSNL कनेक्शन अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार – सरकारी कार्यालयांमध्ये BSNL कनेक्शन सक्तीचे करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार.📌 BSNL च्या विविध योजनांचा आढावा – ग्राहकांसाठी नवीन योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.या बैठकीत BSNL सेवांच्या बळकटीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामुळे नेटवर्क सुधारणे, ग्रामपंचायतींमध्ये NOFN प्रभावीपणे कार्यान्वित करणे.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश; १५ जून पासून जनजागृती

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा..

गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स- 25 पैकी 23 गुदमरुन दगावले, आग लागल्यावर कर्मचारी का पळाले नाहीत? मृतांमध्ये दोघे महाराष्ट्राचे,  यादी

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान…