vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अनुसुचीत जातींच्या आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या थांबवण्याचे विनंती..

अनुसुचीत जातींच्या आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या थांबवण्याचे विनंती..

राज्य प्रतिनिधी,:- शाहू फुले आंबेडकर 165 अनुसुचीत जातींच्या आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या थांबवने बाबत.संदर्भ:- दि.16.03.2025 रविवार रोजी केज तालुका जि.बीड येथील आश्रम शाळेतील शिक्षक कै.धनंजय अभिमान नागरगोजे यांनी वेतनश्रेणी मंजुर होत नसल्याच्या नैराश्यातुन आत्महत्या केली. याबाबत निवेदन

, शाहू फुले आंबेडकर 165 अनुसुचीत जातीच्या आश्रम शाळा योजने अंतर्गत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आश्रम शाळेतील शिक्षक कै.धनंजय अभिमान नागरगोजे सर यांनी 18 वर्षे विनावेतन काम करुन शेवटी वेतनश्रेणी मंजुर होत नसल्याने व आपले घर चालवण्याकरिता ते कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातुन दि.16.03.2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याअनुषंगाने तमाम महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील असे अनेक शिक्षक अनुदानित आश्रम शाळेतील पगार विना काम करत आहेत त्यांची एकच मागणी आहे की सदर 165 आश्रमशाळेंना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान द्यावे. राज्यशासन अशा किती कर्मचा-यांचा बळी घेणार? व अनु.जातीच्या आश्रम शाळेतील शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या कधी थांबणार?

सदर प्रकरण विधीमंडळामध्ये मा.शिक्षक आमदार विक्रम काळे साहेबांनी मांडले असुन त्यामध्ये मृत शिक्षकांच्या कुटुंबाला रु.10,00,000/- (दहा लाख रुपये) ची आर्थिक मदत देण्यात यावी आशी मागणी केले असुन सदरील आर्थिक मदत कुटुंबाला लवकरात लवकर देण्यात यावी.

सदरिल आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान मंजुर करुन शिक्षकांच्या आत्महत्या थांबविण्यात याव्यात, नसता तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटने मार्फत देण्यात आला आहे.

संस्थाचालक संघटना अध्यक्ष एडवोकेट ब्रह्मानंद चव्हाण व संस्थाचालक बबनराव रत्नपारखे एडवोकेट सिद्धार्थ चव्हाण जिल्हा अध्यक्ष विजय भुजंग जिल्हा उपाध्यक्ष गजानन गोतरकर जिल्हा सचिव गौतम मस्के कोषाध्यक्ष सुशील आडे जिल्हा सदस्य गणेश झगडे प्रसिद्धीप्रमुख लहू शिंदे

संबंधित पोस्ट

सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंद• दोन वर्षांत १९ आरोग्य संस्थांना मिळाले राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन• राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालयाला एनक्यूएएस मानांकन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा सैनिक संकुलात स्पर्श प्रणाली मेळावा, आजही कामकाज सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी,काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

vishwatmaklokswamivarta