vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

        जालना, प्रतिनिधी : उच्च न्यायालय मुंबई व मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व एम.आर.डी.ए. स्कुल, जालना यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी एम.आर.डी.ए. स्कुल, जालना येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.

त्याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, जालना तथा प्रमुख न्यादंडाधिकारी जुवेनाईल जस्टीस बोर्ड (जे.जे.बी.), आर.एन. मुजावर, सदस्य बाल न्यायमंडळ, जालना अॅड. अश्विनी एम. धन्नावत, व एम.आर.डी. स्कुलच्या संचालीका ईश्वरी चव्हाण उपस्थित होत्या. त्यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांनी पोक्सो अॅक्ट विषयी मुलांना मार्गदर्शन केले. सचिव प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालयाची माहिती व या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. आर.एन. मुजावर यांनी जुवेनाईल अॅक्ट प्रमाणे बालकांचे हक्क, या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच अॅड. अश्विनी एम. धन्नावत यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ, बाल विवाह या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो

भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर

नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट

vishwatmaklokswamivarta

द केरळ स्टोरी’ प्रमाणे ही कोकण स्टोरी आहे. 🚩 घर वापसी 🚩

vishwatmaklokswamivarta

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत