vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत नोंदणी करणेकरिता आवाहन*

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत नोंदणी करणेकरिता आवाहन*

नवी मुंबई प्रतिनिधी-मा. प्रधानमंत्री महोदय यांनी दि.17 सप्टेंबर 2024 रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ ची घोषणा केली असून त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ ची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय क्रमांकः प्रआयो-2024 / प्र.क्र.87 / गृनिधो – 2, दिनांक 15/10/2024 रोजी जारी केला आहे. सदर शासन निर्णयामध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

1) वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (Beneficiary Led Construction) (BLC)

2) भागीदारी तत्वावरील परवडणारी घरे (Affordable Housing in Partnership) (AHP)

3) भाडे तत्वावर परवडणारी घरे (Affordable Rental Housing) (ARH)

4) व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme) (ISS)

या अनुषंगाने ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ ची राज्यात अंमलबजावणी करणे तसेच ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ अंतर्गत लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एक युनिफाईड वेब पोर्टल (https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx ) विकसित केले आहे. सदर पोर्टलवरती इच्छुक लाभार्थी यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

युनिफाईड वेब पोर्टलवर नोंदणी करणेकरीता लागणारी कागदपत्रे :

1) अर्जदाराचे आधारकार्ड, पॅन कार्ड (आधारकार्डनुसार नाव, जन्मतारीख, आधार क्र.)

2) कुटुंबातील इतर सदस्याचे आधार कार्ड (आधारकार्डनुसार नाव, जन्मतारीख, आधार क्र.)

3) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचेकडील चालू आर्थिक वर्षातील)

4) बँक पासबुक (आधार लिंक केलेले असले पाहिजे)

5) जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC घटकांसाठी लागू)

6) जमिनीची कागदपत्रे (घटक क्र.01 अंतर्गत अर्ज करणा-या लाभार्थ्यांकरिता)तरी, इच्छुक लाभार्थी यांनी सदर योजनेंतर्गत नोंदणी करणेकरिता आवश्यक कागदपत्रांसह नवी मुंबई महानगरपालिका, समाज विकास विभाग, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथील ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0’ मदत कक्षाशी अथवा अधिक माहितासाठी 9967413935 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड..

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीरसहकार विद्यामंदिर येथे आयोजन ; बुलढाणावासियांनी रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी