vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट…

 

राज्य प्रतिनिधी-
नागपूर,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बुद्धवंदना दिली.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यावेळी उपस्थित होते.
अभिप्राय नोंदवहीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूर स्थित दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य लाभल्याने मी भारावून गेलो आहे. या पवित्र स्थळाच्या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समता, समानता आणि न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव येतो. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते. मला पूर्ण विश्वास आहे की या अमृत काळात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी आणि मूल्यांचा मार्ग अनुसरून देशाला प्रगतीच्या नवीन शिखरावर नेऊ. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणे हीच डॉ. बाबासाहेबांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल’, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नोंदविला.

संबंधित पोस्ट

महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णयावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी तुफान टीका

vishwatmaklokswamivarta

उद्योग सुरु करायचाय? एमआयडीसीत मिळेल जागा*एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप होणार ; ऑनलाईन निविदा प्रक्रियेला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार राज्यातील अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर होऊनत्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

आमदार अपात्रता प्रकरण:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रिम कोर्टात नव्याने सादर करणार वेळापत्रक…

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन गेमनंतर आता करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर? नाशिकच्या कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार…