vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

 

ठाणे प्रतिनिधी-

(जिल्हा परिषद, ठाणे) – उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आज, १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ०७.०० ते ११.१५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली तर माध्यमिक शाळांसाठी ०७.०० ते ११.४५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ?

१. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.

४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.

५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.

६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.

७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.

८. उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालणे.९. उन्हात बाहेर पडणे टाळणे.

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद शाळाचे वेळ बदल करण्यात आले असून शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.

000

संबंधित पोस्ट

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित

करजगीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची दिली होती ग्वाही- उमदी पोलिस ठाण्याच्या तपासाला यश..

जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल· नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम गडचिरोलीत लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन