vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी वाहनासाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा…

*प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी वाहनासाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा…

                सातारा प्रतिनिधी :प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच 11 डिव्ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 7 एप्रिल 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील. या मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

7 एप्रिल 2025 रोजी चारचाकी एलएमव्ही वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. ज्या आकर्षक कमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत हजारो श्रीगणेशमूर्तींचे अजूनही विसर्जन बाकी ,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने शास्त्रोक्तविसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी  

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta

बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचे आवाहन

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*