vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

 

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग संचालनालयाच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद मंगळवारी, ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, मलकापूर रोड येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.

गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधणे, राज्याच्या आर्थिक बळकटीस हातभार लावणे आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष आणि अन्य शासकीय संस्थांचा सक्रिय सहभाग असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल तसेच गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्याची संधी मिळणार आहे.या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न होणार आहे.

परिषदेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांवर चर्चा, गुंतवणूक संधींचे सादरीकरण, यशस्वी उद्योजकांचे अनुभव कथन यांचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00०००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून  मुंबईत

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील रमाई आवास योजना समितीची ५ हजार ७०० घरकुलांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…