vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड..

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड..

खेड प्रतिनिधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने जिल्हा प्रेरणा मेळाव्याचे आयोजन चिपळूण येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते. या प्रेरणा मेळाव्यात नवीन जिल्हा कार्यकारणी सन २०२५ ते २०२७ साठी निवड करण्यात आली असून अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव विजय परब, विजय पोटफोडे, सचिन गोवळकर, सचिन मोहीते तसेच मंडणगड, खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्वर, देवरुख, राजापूर, गुहागर, येथील शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे

उपाध्यक्ष विलास कोलपे, विजय कांबळे, प्रधान सचिव सुहास शिगम, संदीप गोवळकर, विविध उपक्रम कार्यवाह भिमराव गगंणे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प कार्यवाह अनंत पवार, सोशल मीडिया व्यवस्थापन कार्यवाह मनोज तानू जाधव, कायदेविषयक कार्यवाह ऍड स्मिता कदम, संविधान जागर कार्यवाह महावीर मिसाळ, संपर्क व समन्वय विभाग कार्यवाह युयुत्सु आर्ते यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी सचिन गोवळकर, विजय परब, तानू आंबेडकर, युयुत्सु आर्ते यांनी कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

000000000000

संबंधित पोस्ट

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

एनसीसी प्रशिक्षणांतर्गत भोजनखर्चाचे दरपत्रक ५ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 

vishwatmaklokswamivarta

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न..

हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..