vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील  विविध विकास कामांचे उद्घाटन…

 

सोलापूर, प्रतिनिधी- माळशिरस तालुक्यातील म्हेत्रे मळा (वेळापूर), नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते शहरासाठी पुणे – पंढरपूर रोडवर आधुनिक स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे. याचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास माजी आमदार राम सातपुते, मुख्याधिकारी डॉ कल्याण हुलगे,नगराध्यक्षा अनिता लांडगे, तसेच नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी, रस्ते, गटारीसाठी, सभामंडप, मंदिरांचे जीर्णोद्धार यासाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर नगर विकास खात्याच्या योजनेमधून अत्याधुनिक स्ट्रीट लाईट 2 कोटी 65 लाख रुपयांची विशेष निधी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हि योजना मंजूर करून आणली असल्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी म्हेत्रे मळा (वेळापूर),येथे वेळापूर- पिसेवाडी 4 किमी व अन्य 7 रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कामांचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संबंधित ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर येथे भेट देऊन पालकमंत्री गोरे यांनी दर्शन घेतले. यावेळी मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

बुलढाण्यात अवैध मद्यविक्री विरोधात धडक मोहीम; ११० गुन्हे, १४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta