vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील वधु वर मेळावा संपन्न…

 डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील वधु वर मेळावा संपन्न…

[ मुंबई प्रतिनिधी -धारावीतील पंचरत्न महापुरुष विचार संयुक्त मंच यांच्या माध्यमातून मुंबईतील चर्मकार समाजातील ढोर चांभार कक्कया हराळे या समूहातील विवाह इच्छुक वधू वरांसाठी निवडीसह पालकांच्या ताण तणाव कमी करणे व दोन्ही समूहातील घटकांना एकत्र जोडण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर स्थळ धारावी काळा किल्ला मनपा शाळा संत रोहिदास मार्ग धारावी येथे सकाळी साडे दहा ते अडीच त्या वेळात शुभेच्छुक दोन्ही समूहातील वधू-वरांना निवडीचे स्वातंत्र्य दिले होते त्यावेळी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाच्या संत कक्कया संत रोहिदास महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सर्वांसमोर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी श्री गिरीराज शेरखाने यांनी कार्यक्रमातील पत्रकाचे वाचन करून नियोजन सांगितले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करून वधू-वरांना आपापल्या वयोमानाप्रमाणे तसेच दोन्ही समाजातील वधू-वरांना निवडीचे खुले आव्हान करून स्वातंत्र्य दिले सोबत पालकही उपस्थित होते मध्यावर कार्यकर्त्याची पार्श्वभूमी व उद्देशिका तसेच दोन्ही समाजातील अंतर दूर करण्यासाठी हा वेगळा प्रयोग होत असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी व्यवस्था श्री शंकर पोटे चंद्रकांत जाधव गोविंद भोईटे सविता शेरखाने यांनी पाहिली तर नोंदणी कक्षाची जबाबदारी वर्षा शिंदे नामदेव अब नावे अलका साबळे यांनी पार पडली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत दिलीप गाडेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र वटकर अशोक काळे चतुर गायधनकर शंकर गोपीर्डे त्यांची मदत झाली या कार्यक्रमासाठी समाजसेवक श्री गणेश खाडे व श्री बाबुराव माने यांनी शुभेच्छा देऊन सहकार्य केले कार्यक्रमासाठी नियोजित वधू-वर सह शेकडो पालक कार्यक्रम स्थळी उपस्थित होते राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

आज 19 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी…

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची..

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती