vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

युवकांनी गाजविला ‘जागर’चा ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ व्याख्यान उपक्रम…

युवकांनी गाजविला ‘जागर’चा ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ व्याख्यान उपक्रम…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी     ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजल्या जाणा-या ऐरोली नवी मुंबई येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून 2 एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘जागर’ या व्याख्यानमालेची सांगता विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या 4 युवा पिढीतील प्रतिनिधींच्या सुसंवादाने झाली. ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या शिर्षकांतर्गत आयोजित या युवा सुसंवाद कार्यक्रमाला श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली.  महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना बाबासाहेबांचे अनेक क्षेत्रातील महनीय कार्य सर्वांपर्यंत पोहचावे व यामधून प्रेरणा घेता यावी यादृष्टीने आयोजित करण्यात आलेली ‘जागर’ व्याख्यानमालेची संकल्पना नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिल्याने यशस्वी झाली याचा आनंद व्यक्त केला. हे संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून यामध्ये ‘हर घर संविधान’ अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये मुंबई विद्यापीठाचा सहयोग घेण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती ध्यानात घेऊन येथील समृध्द ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.शंकर खाडे, लेट्स रीड फाऊंडेशनचे प्रमुख तथा लेखक श्री.प्रफुल्ल वानखेडे उपस्थित होते.

भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या युवा सुसंवादात जागतिक किर्तीचे व्याख्याते – लेखक ॲड.निखिल अडसुळे यांनी बाबासाहेबांकडून कोणते गुण घ्यायचे तर प्रज्ञा, शील व करूणा. या त्रिसूत्रीची मांडणी करताना प्रत्येक गुणाविषयी बाबासाहेबांच्या जीवनपटातील विविध उदाहरणे देत त्यांचे महत्व त्यांनी विशद केले. हॉवर्ड, शिकागो, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि परदेशात विविध ठिकाणी आपण दिलेल्या व्याख्यानांचे अनुभव सांगत त्यांनी बाबासाहेबांची महती उलगडली.

 युवा उद्योजक, गिर्यारोहक श्री.आनंद बनसोडे यांनी बाबासाहेबांच्या फोटोकडे बघून असे व्हायला व्हावे हे लहानपणापासून मनात ठसले आणि जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी झुंजा देत केलेला आपला जीवनप्रवास उलगडला. लहानपणी वाळूच्या ढिगा-यावर खेळण्यापासून माऊंट एव्हरेस्ट सर करण्यापर्यंतची त्यांची वाटचाल ऐकताना “स्वप्ने पाहता यायला हवीत, स्वत:वर विश्वास हवा, मग सारे काही साध्य होते” हे त्यांचे शब्द नवी चेतना देणारे ठरले.   पुस्तके माणसाला खूप काही शिकवतात, त्यासाठी खूप वाचायला पाहीजे असे सांगत युवा उद्योजक व मार्गदर्शक श्री.अश्विन नंदापूरकर यांनी पुस्तके आवडतात कारण मला नवनवीन गोष्टी शिकायला आवडते अशा शब्दात वाचनाचे महत्व अधोरेखित केले. स्मारकातील ग्रंथालय इतके समृध्द आहे की त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पुस्तके आणि प्रवास यामधून माणूस समृध्द होत जातो हे त्यांनी स्वानुभव सांगत उलउलगडले.

  ‘बा भीमा’ या कॉमिक सिरीजचे संकल्पनाकार श्री.सुरज वाघमारे यांनी घरातला बाबासाहेबांचा फोटो पाहून मुलाने “हा कोणाचा फोटो आहे?” हे विचारले, तेव्हा लहान मुलांपर्यंत बाबासाहेबांचे मोठेपण पोहचविण्यासाठी त्यांना आवडेल अशा कॉमिक्स माध्यमाचा वापर करण्याची संकल्पना पुढे आली आणि मग अमर चित्र कथाच्या धर्तीवर पत्नी गीतासह या कॉमिक्स बुक्सची निर्मिती करण्याचे ठरविले असे सांगितले. तरूणाईने आदर्श नीट तपासून घ्यावेत व त्याचे ग्लॅमर न बघता त्या व्यक्तीचा संघर्ष बघावा, म्हणजे आपण घडत जातो असा संदेश दिला.

    चारही वक्त्यांनी विविधांगी अनुभव सांगत बाबासाहेबांची महती, शिक्षणाचे व वाचनाचे आपल्या जडणघडणीतील महत्व तसेच आपापला जीवनप्रवास उलगडवला. समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या आणि निश्चित ध्येय नजरेसमोर ठेवून खंबीर वाटचाल करणा-या या चारही युवकांचे अनुभव ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. एकंदरीतच ‘जागर 2025’ व्याख्यानमालेची यशस्वी सांगता या उद्याचे भविष्य असणा-या युवा पिढीच्या आश्वासक सूरांमध्ये झाली. 00000

संबंधित पोस्ट

तंबाखुमुक्ती जनजागृती बाईक रॅलीस प्रतिसाद

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी

गोदाकाठच्या पूरग्रस्तांना ‘समृद्धी’ने दिला माणुसकीचा हात…

vishwatmaklokswamivarta

शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठीजलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगलीत जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद